Update | फोंडघाटात जळून खाक झालेली इर्टीगा कणकवलीतील उद्योजक निलेश काणेकर यांची,गाडीत जळालेल्या अवस्थेत सांगाडा

तो डीएनए तपासासाठी पाठवणार

कार मालक निलेश काणेकर यांचा फोन नॉट रिचेबल, तर्कवितर्क आणि पोलीस तपास सुरू

वागदे ग्रामस्थांची घटनास्थळी धाव

संतोष राऊळ (कणकवली)
राधानगरी येथे जातो असे ऑफिस मध्ये सांगून गेलेल्या कणकवली तालुक्यातील वागदे येथील
उद्योजक निलेश काणेकर यांच्या इर्टिका कारला फोंडाघाटात भीषण आग लागली.यात एकाचा जळून मृत्यू झाला आहे.मात्र निलेश काणेकर यांचा फोन नॉट रिचेबल लागत असल्याने यातील व्यक्ती कोण याचा उलगडा होत नाही.दरम्या राधानगरी येथे जातांना काही लोकांनी काणेकर यांना पाहिले होते ते एकटेच गाडी चालवत जात होते अशी माहिती मिळाली आहे.तर पोलीस घटनास्थळी पंचनामा करून जळलेला मृतदेह डीएनए तपासणी साठी पाठविणार आहेत.तर काणेकर यांचे मोबाईल लोकेशन तपासले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फोंडाघाटात खिंडी नजीक इर्टिका कारला भीषण आग लागल्याची घटना सायंकाळी घडली.ही कार आरटीओ दप्तरी निलेश विवेकानंद काणेकर यांच्या नावे नोंद असल्याचे स्पष्ट झाले आहे.पोलीस व वागदे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या भीषण आगीत एका इसमाचा सांगाडा जळलेल्या स्थितीत गाडीत आढळून आला आहे.मात्र,तो कोणाचा याची चौकशी सुरू आहे, दरम्या गाडीचे मालक निलेश काणेकर याचा मोबाईल बंद येत असल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.त्यामुळे कारमधील जळालेली व्यक्ती कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचून तपास करी आहे.
कणकवली वागदे येथील एन.के.डेकोरेशनचे मालक, उद्योजक निलेश काणेकर याची ही जळलेली इर्टिका कार आहे.कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठ येथून ६ किलोमीटरवर घाट रस्त्यात मारुती इर्टिका कारला सायंकाळी ५ वाजता भीषण आग लागली.या भीषण आगीत इर्टिका कार खाक झाली,त्याचा क्रमांक ( MH-07 AG – 6297) असा नंबर आहे.त्याची पडताळणी केली असता निलेश काणेकर यांच्या नावे असल्याचे स्पष्ट होत आहे.
घटनास्थळी कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर,उपनिरीक्षक श्री. देठे,मंगेश बावधने व पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.तसेच वागदे गावातील माजी सरपंच संदीप रमाकांत सावंत,नगरसेवक अण्णा कोदे, समीर प्रभुगावकर,कणकवली सभापती मनोज रावराणे, फोंडा सरपंच संतोष आंग्रे,नगरसेवक संजय कामतेकर,लल्लू ताम्हाणेकर,गौरव मुंज, वैभव काणेकर,नगरसेवक कन्हैया पारकर,मधुकर सावंत यांच्यासह कणकवली,वागदे गावतील व फोंडाघाट ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहचले आहेत.

जाहिरात4