रत्नागिरी Corona Updates : कोरोना मुक्त ७; नवे रुग्ण २; मृत्यू ०; एकूण उपचाराखाली रुग्ण ७; रुग्णालयात ४

3corona

रत्नागिरी । प्रतिनिधी :

गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यात दोन नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ४५८ जणांच्या स्वॅब तपासणीत हा अहवाल आला आहे. जिल्ह्यात सध्या ७ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. त्यातील ४ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे.

नव्या दोन रुग्णांमुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधित रुग्णांची संख्या ८४४५६ असून त्यातील आतापर्यंत ८१९१५ जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९९ % इतके आहे.

२४ तासात एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाहीये मात्र जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २५३४ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण मृत्यूचे हे प्रमाण ३ टक्के आहे.

जिल्ह्यात ७ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. त्यातील ३ रुग्ण गृहविलगिकरणामध्ये उपचार घेत आहेत. हे प्रमाण ४२. ८६ % इतके आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी ऑक्सिजनावर ० तर आयसीयुमध्ये ० रुग्ण उपचार घेत आहेत.

दाखल झालेल्या कोरोना रुग्णांपैकी तालुकानिहाय आकडेवारीनुसार मंडणगड ०, दापोली ०, खेड २, गुहागर ०, चिपळूण ०, संगमेश्वर ०, रत्नागिरी ०, लांजा ०, राजापूर ०.

(माहितीसाठी : कोरोना विषयक माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून दिली जाते तसेच हि माहिती कोरोना पोर्टल वर update होत असल्याने आकडेवारीत नेहमी बदल होत असतो )

जाहिरात4