शासनाच्या संगीत नाट्य स्पर्धेचे रत्नागिरीत झाले उदघाटन

गोव्यासह महाराष्ट्रातील १६ नाटके होणार सादर

रत्नागिरी । प्रतिनिधी
सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६० वी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेचे उदघाटन रत्नागिरीत गुरुवारी जेष्ठ रंगकर्मी डॉ. गजानन रानडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषद शाखेचे सदस्य भाग्येश खरे, परीक्षक मुकुंद मराठे, अर्चना साने, विलास कुडाळकर, ज्ञानेश पेंढारकर, विजय कुलकर्णी हे उपस्थित होते. स्पर्धेत अखिल चित्पावन ब्राह्मण विदयार्थी सहा. मंडळ, रत्नागिरी यांचे ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक पहिले सादर झाले असून आता २७ मार्चपर्यंत स्पर्धेत गोव्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील १६ नाटके सादर होणार आहेत.

जाहिरात4