लांजा ग्रामीण रूग्णालयातील कंत्राटी कर्मचारी तीन महिने मानधनापासून वंचित

लांजा । प्रतिनिधी

लांजा ग्रामीण रूग्णालयात कंत्राटी पध्दतीवर काम करणा-या सफाई कामगार, परिचर, चालक यांना गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. कहर म्हणजे हे मानधन अत्यंत तुटपूंजे असताना ऐन दिवाळीसारख्या सणामध्येही त्यांना मानधन देण्यात चालढकलपणा करण्यात आल्याने या कर्मचा-यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याला जबाबदार शासन की ठेकेदार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

लांजा ग्रामीण रूग्णालय हे तालुक्याचे रूग्णालय असून याठिकाणी रूग्णांची कायम गर्दी असते. या रूग्णालयाच्या दूरावस्थेबाबत सातत्याने वृत्तप ाांतून आवाज उठवूनही शासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासिन भूमिकेमुळे याठिकाणी रूग्णांची कायमच परवड होताना दिसून येत आहे. त्यात आता भर पडली आहे ती याठिकाणी काम करणाºया कर्मचाºयांची. लांजा ग्रामीण रूग्णालयात सद्यस्थितीत कं ााटी पध्दतीवर ६ ते ७ कर्मचारी काम करत आहेत. यामध्ये वाहन चालकासह सफाई कामगार, परिचर आदींचा समावेश आहे. यापैकी रूग्णवाहिका वाहनचालकांना ७ ते ८ हजार रूपये तर अन्य कर्मचाºयांना साडेचार ते पाच हजार रूपये इतके अत्यल्प मानधन देण्यात येते. कंत्राटी पध्दतीवर हे सर्व कामगार असल्याने अत्यंत तुटपूंज्या अशा मानधनावर त्यांना कामासाठी अक्षरश राबवून घेतले जात असल्याचे कामगारांतून बोलले जात आहे. इतके अत्यल्प मानधन देवून त्यांची बोळवण केली जात असली तरी हे सर्व कर्मचारी निमुटपणे काम करत आहेत.

अशी परिस्थिती असताना या सर्व कंत्राटी कर्मचा-यांना गेल्या तीन महिन्यांपासूनचे मानधन आजतागायत देण्यात आलेले नाही. आधीच अत्यल्प मानधन देण्यात येते. त्यात पुन्हा अशी तीन महिन्यांची बोंब असेल तर आम्ही आणि आमच्या कुटूंबियांनी करावयाचे काय असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. या सर्व कर्मचाºयांचे मानधन थकविणारे नेमके कोण? शासन की कंत्राटदार असा प्रश्न असून तीन महिन्यांपासून रखडविण्यात आलेल्या त्यांच्या मानधनामुळे या कंत्राटी कर्मचाºयांची आणि त्यांच्या कु टूंबियांसमोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.

जाहिरात4