ओल्या दुष्काळात कोरडी सहानूभूती नको. .!

माझे कोकण/संतोष वायंगणकर
महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला नाही.तर यावर्षी पावसाळा सुरूच राहीला.पाऊस थांबणार कधी असा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकºयांना पडला. कोकणातही शेतकरी हवालदिल झाला आहे. भातशेतीचे मोठे नुकसान रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे.हाता तोडांशी आलेला घास हिरावून न्यावा तशीच काहीशी अवस्था या शेतकºयांची झाली आहे. ज्या भागात जमीनीत पाण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा ठिकाणच्या शेतीने केव्हाचीच मान टाकली. कोकणातील अनेक शेतकºयांच्या शेतात भातशेतीला पुन्हा कोंब आले. यामुळे तयार झालेले भात घरा पर्यंत पोहचणे मुश्किल झाले आहे.२४ तारीखला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला.भातशेतीचे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या आणि शेतकºयांचा हा जीवन मरणाचा विषय ऐरणीवर आला. काही लोकप्रतीनिधींनी याही स्थितीत शेतकºयांसोबत उभे राहून फोटो काढून घेण्यात आले. नुकसानीच्या दु:खाचा डोंगर डोक्यावर घेऊन वावरणारा शेतकरी फक्त त्याला झालेल्या नुकसानीची मोठ्या प्रमाणावर भरपाई मिळावी अशी मागणी करीत आहेत. कोकणातील शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्रातील कोणतेही आणि कुणाचेही सरकार असले तरीही उर्वरित महाराष्ट्रातील राजकीय नेते कधीही कोकणातील शेतकºयाच्या बाबतीत कधीही सकारात्मक विचार करण्याची शक्यता नाही.
राज्याचे विद्यमान वित्त राज्य मंत्र्यांंनी कोकणातील शेतकºयांना एकरी १५ हजार रुपयेची मदत राज्य सरकार देईल असे जाहीर केले आहे. परंतू गेल्या पाच वर्षांतील हजारो कोटी जाहीर केले. खरोखरच जमा रक्कम काही नाही. पाच वर्षांतील दिले कोणी आणि घेतले कोणी असाच हा सारा व्यवहार राहिला आहे. कोकणातील शेतकºयांचे जे नुकसान झाले आहे.त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून कोकणातील शेतकरी संघटीतरित्या काहीही करणार नाही. विविध राजकीय विचारसरणी मध्ये शेतकरीही विखुरला आहे.शेतकºयांच्या प्रश्नासाठी सर्व सामान्य शेतकरीच पुढे राहीला पाहिजे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोºयातील शेतकरी एकवटला आणि त्यानी प्रयत्न करायला सुरुवातही केली आहे. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कणकवली वैभववाडी आणि देवगड मतदार संघाचे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी भेट घेतली. या भेटीत कोकणातील शेतकरी भातशेती आणि फळ बागायती नुकसान कसे झाले आहे. हि नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली. त्यानंतर प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले. त्यानंतरच कोकणातील प्रशासन हलले आहे.
मात्र शेतकºयांचे जे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे झाले पाहिजेत.शासकीय अधिकारी जर आॅफीसमध्ये बसून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले तर भरपाई कशी काय मिळू शकेल. असा प्रश्न च शेतकºयांना पडला आहे. कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकºयांची मागणी आहे. शेतकºयाच्या या मागणीला राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली तर कोकणातील शेतकºयांना थोडा तरी आधार वाटेल. दरवर्षी कोकणातील शेतकरी नवीन भाताचे पोहे दिवाळीच्या पहिल्या दिवशी करतो. यावर्षी शेतात साचलेले पाणी पाहून हतबल झाला. शेतकºयांच्या डोळ्यातील पाण्याने निसर्गही वेदनेने व्याकूळ झाला असेल. कोकणातील ओल्या दुष्काळात राजकीय पुढाºयांची कोरडी सहानूभूती नको. शासकीय भरीव आर्थिक मदत हवी!

मोबाईल : ९४२२४३६६८४

जाहिरात4