जाकादेवी येथे दुचाकीची रस्त्यावरील गायीला धडक; जखमी चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी । प्रतिनिधी
बेदरकारपणे दुचाकि चालवून गाईला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वा.जाकादेवी ते चाफे जाणार्‍या रस्त्यावर घडली.

शांताराम सखाराम काताळे (40,रा.चाफे काताळेवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकि चालकाचे नाव आहे.शुक्रवारी सायंकाळी तो आपल्या ताब्यातील दुचाकि (एमएच-08-एडब्ल्यू-8455) वरुन जाकादेवी ते चाफे असा जात होता.त्यावेळी रस्ता ओलांडणार्‍या गाईला त्यांनी धडक देत अपघात केला. यात शांताराम काताळे यांना दुखापत झाली असून अधिक तपास पोलिस हवालदार राजवैद्य करत आहेत.

जाहिरात4