मिरकरवाडा जेटीजवळ नांगरुन ठेवलेल्या बोटीवरुन समुद्रात तोल जाऊन पडला खलाशी; रविवारी मृतदेह सापडला

रत्नागिरी । प्रतिनिधी
शहरातील मिरकरवाडा जेटीजवळ नांगरुन ठेवलेल्या बोटीवरुन समुद्रात पडलेल्या खलाशाचा मृतदेह रविवारी सकाळी 7 वा.मिळून आला.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रदेश जगना चौधरी थारु (37, मुळ रा. नेपाळ सध्या रा.मिरकरवाडा जेटी,रत्नागिरी) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे. याबाबत महंमद अली अब्दुल सत्तार राजपुरकर (35, रा. खडप मोहल्ला मिरकरवाडा, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानूसार, शुक्रवार 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. मिरकरवाडा जेटी येथे नांगरुन ठेवलेल्या बोटीवर प्रदेश दंगामस्ती करत असताना तोल जाउन समुद्राच्या पाण्यात पडून बेपत्ता झाला होता. रविवारी सकाळी जेटी नं. 2 जवळ पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार पालांडे करत आहेत.

जाहिरात4