रत्नागिरी Corona Updates : कोरोना मुक्त 21; नवे रुग्ण 12; मृत्यू 0; एकूण उपचाराखाली रुग्ण 108; ऑक्सिजनावर 0; आयसीयु 1 रुग्ण

रत्नागिरी । प्रतिनिधी :

रविवारी रत्नागिरी जिल्ह्यात 12 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 542 जणांच्या स्वॅब तपासणीत हा अहवाल आला आहे. जिल्ह्यात सध्या 108 जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत.

नव्या 12 रुग्णांमुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधित रुग्णांची संख्या 84389 असून त्यातील 21 रुग्ण गेल्या 24 तासातील तर आतापर्यंत 81704 जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.82 % इतके आहे.

24 तासात एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाहीये मात्र जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 2532 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण मृत्यूचे हे प्रमाण 3 टक्के आहे.

जिल्ह्यात 108 जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. त्यातील 35 रुग्ण गृहविलगिकरणामध्ये उपचार घेत आहेत. हे प्रमाण 32.41 % इतके आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी ऑक्सिजनावर 0 तर आयसीयुमध्ये 1 रुग्ण उपचार घेत आहेत.

रविवारी दाखल झालेल्या 12 कोरोना रुग्णांच्या तालुकानिहाय आकडेवारीमध्ये मंडणगड 0, दापोली 2, खेड 0, गुहागर 2, चिपळूण 1, संगमेश्वर 0, रत्नागिरी 4, लांजा 2, राजापूर 1.

(माहितीसाठी : कोरोना विषयक माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून दिली जाते तसेच हि माहिती कोरोना पोर्टल वर update होत असल्याने आकडेवारीत नेहमी बदल होत असतो )

जाहिरात4