कुडाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ निकाल

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या निकाला नंतर भाजपने ८ तर शिवसेनेने ७ जागांवर विजय मिळवला आहे. तर स्वबळावर निवडणुक लढणार्या काँग्रेसला दोन जागांवर यश आल्याने नगरपंचायतीतील सत्तेच्या चाव्या काँग्रेसच्या हातात राहिल्याने काँग्रेस किंगमेकर ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेस कोणाला पाठिंबा देणार यावर कुडाळ मधील सत्तेचे गणित अवलंबून राहिले आहे.
कुडाळ नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली होती. तर काँग्रेसने या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. या नगरपंचायतीचे निकाल बुधवारी हाती आले आहेत. यामध्ये भाजपाने सर्वात मोठा पक्ष बनत १७ पैकी ८ जागांवर यश मिळविले असले तरी शिवसेनेने येथे जोरदार मुसंडी मारत ७ जागा ताब्यात घेतल्या आहेत. तर २ जागा काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या सत्तेच्या गणितात काँग्रेस पक्ष किंगमेकर ठरला आहे. काँग्रेसने शिवसेना राष्ट्रवादीसोबत न जाता स्वबळावर निवडणूक लढवल्याने या ठिकाणी चमत्कार घडून काँग्रेसचा पाठिंबा आपल्याला मिळेल, या आशेवर भाजपाचे कार्यकर्ते आहेत. तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने या निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्रपणे लढली असली तरीही काँग्रेसचे दोन्ही उमेदवार शिवसेनेसोबत राहतील, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे.

प्रभाग क्र. १ कविलकाटे (सर्वसाधारण महीला)
येथे शिवसेनेच्या ज्योती जळवी यांनी 304 मते मिळवून विजय संपादन केला. यात भाजपच्या सखु आकेरकर यांना 303 मते पडली केवळ एका मताने त्यांचा पराभव झाला. तर काँग्रेसच्या रंजना जळवी यांना 31 मते पडली. नोटा 3 व एकुण 678 मतदान झाले.
प्रभाग क्र. २ भैरववाडी (सर्वसाधारण महीला) मध्ये भाजपाच्या नयना मांजरेकर 370 यांनी मते मिळवून विजय मिळवला. शिवसेनेच्या अनुजा राऊळ यांना 250 मते मिळाली व त्यांचा पराभव झाला. तर नोटा 6 मिळुन एकुण 675 मतदान झाले.
प्रभाग क्र.3 लक्ष्मीवाडी (सर्वसाधारण महिला) मध्ये भाजप, शिवसेना अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या चांदणी कांबळी यांनी 259 मते मिळवून विजय मिळवला. शिवसेनेच्या अश्विनी पाटील यांना 244 मते मिळाली व त्यांचा पराभव झाला. तर नोटा11 मिळुन एकुण 514 मतदान झाले.
प्रभाग क्र. ४ बाजारपेठ (सर्वसाधारण महीला) मधील चौरंगी लढतीत शिवसेनेच्या श्रुती वर्दम यांनी 288 मते मिळवून विजय मिळवला तर भाजपच्या रेखा काणेकर यांना 186, काँग्रेसच्या सोनल सावंत यांना 137, अपक्ष मृण्मयी धुरी यांना 39 मते मिळाली. नोटा 3 मिळुन एकुण 593 मतदान झाले.
प्रभाग क्र. ५ कुडाळेश्वर वाडी (सर्वसाधारण) मधील पंचरंगी अटीतटीच्या लढतीत भाजपच्या अभिषेक गावडेनी 318 मते मिळवित विजय संपादित करीता शिवसेनेच्या प्रवीण राऊळ यांना 142, अपक्ष सुनील बांदेकर 65, मनसेचे रमाकांत नाईक 11, काँग्रेसचे रोहन काणेकर 47 यांचा पराभव केला. नोटा 5 मिळुन एकुण 588 मतदान झाले.
प्रभाग क्र. ६ गांधीचौक (सर्वसाधारण महीला) चौरंगी लढतीत भाजपाच्या प्राजक्ता बांदेकर यांनी 170 मते मिळवित विजय संपादन केला. शिवसेनेच्या देविका बांदेकर यांना 129 मते मिळाली तर अपक्ष आदिती सावंत यांना 141, काँग्रेसच्या शुभांगी काळसेकर यांना 67 मते मिळाली. यामध्ये नोटा 7 मिळुन एकुण 514 मतदान झाले.
प्रभाग क्र. ७ डाॅ. आंबेडकर नगर (सर्वसाधारण) मध्ये भाजपच्या विलास कुडाळकर यांनी 193 मते मिळवित विजय संपादन केला. शिवसेनेच्या भूषण कुडाळकर 172 मिळाली. काँग्रेसच्या मयूर शारबिद्रे यांना 99 मते मिळाली. तर नोटा 7 मिळुन एकुण 471 मतदान झाले.
प्रभाग क्र. ८ मस्जिद मोहल्ला (सर्वसाधारण महीला) मध्ये काँग्रेसच्या आफरीन करोल यांनी 134 मते मिळवून विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मानसी सावंत यांना 74, भाजपच्या रेवती राणे यांना 11 मते मिळाली. तर नोटा 1 मिळुन एकुण 220 मतदान झाले.
प्रभाग क्र. 9 नाबरवाडी (सर्वसाधारण महीला) मध्ये शिवसेनेच्या श्रेया गवंडे यांनी 285 मते मिळवित विजय संपादन केला. भाजपच्या साक्षी सावंत यांना 266 मते मिळाली व त्यांचा पराभव झाला. तर नोटा 10 मिळुन एकुण 561 मतदान झाले.
प्रभाग क्र 10 केळबाईवाडी (सर्वसाधारण महिला) मध्ये काँग्रेसच्या अक्षता खटावकर यांना 226 मते मिळवित विजय संपादन केला. भाजपच्या रीना पडते यांना 155 तर शिवसेनेच्या प्रांजल कुडाळकर 141 मते मिळाली व त्यांचा पराभव झाला. तर नोटा 4 मिळुन एकुण 526 मतदान झाले.
प्रभाग क्र. 11 गणेश नगर (अनु. जाती सर्वसाधारण) मध्ये भाजपाच्या राजीव कुडाळकर यांनी 161 मते मिळवून विजय मिळवला. शिवसेनेच्या गुरुनाथ गडेकर यांना 153 तर काँग्रेसच्या सिद्धार्थ कुडाळकर यांना 23 मते पडली व त्यांचा पराभव झाला. तर नोटा 2 मिळुन एकुण 339 मतदान झाले.
प्रभाग क्र.12 हिंदु काॅलनी (सर्वसाधारण) मध्ये भाजपाच्या संध्या तेरसे यांनी 333 मते मिळवून विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेमंत कुडाळकर यांना 182 मते मिळाली व त्यांचा पराभव झाला. तर नोटा 11 मिळुन एकुण 526 मतदान झाले.
प्रभाग क्र.13 श्रीरामवाडी (सर्वसाधारण महीला) शिवसेच्या सई काळप यांनी 312 मते मिळवून विजय मिळवला. भाजपच्या तेजस्विनी वैद्य यांना 114 मते व काँग्रेसच्या विमल राऊळ यांना 54 मते मिळाली व त्यांचा पराभव झाला. तर नोटा 6 मिळुन एकुण 486 मतदान झाले.
प्रभाग क्र.14 अभिनव नगर (सर्वसाधारण) मध्ये शिवसेनेच्या मंदार शिरसाट यांनी 257 मते मिळवून विजय मिळवला. भाजपच्या प्रज्ञा राणे यांना 78 तर काँग्रेसच्या केतन पडते यांना 25 मते मिळाली व त्यांचा पराभव झाला. तर नोटा 4 मिळुन एकुण 364 मतदान झाले.
प्रभाग क्र.15 मधली कुंभारवाडी (सर्वसाधारण) मध्ये शिवसेनेच्या उदय मांजरेकर यांनी 238 मते मिळवून विजय मिळवला. भाजपच्या प्रशांत राणे यांना 175, काँग्रेसच्या गणेश भोगटे 153 मते मिळाली व त्यांचा पराभव झाला. तर नोटा 5 मिळुन एकुण 571 मतदान झाले.
प्रभाग क्र 16 एम.आय.डी.सी. (सर्वसाधारण) मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या किरण शिंदे यांनी 398 मते मिळवून विजय मिळवला. मनसेच्या सहदेव पावसकर यांना 265 मते मिळाली व त्यांचा पराभव झाला. तर नोटा 8 मिळुन एकुण 681 मतदान झाले.
प्रभाग क्र. 17 सांगिर्डेवाडी (सर्वसाधारण) मध्ये भाजपाच्या, शिवसेना यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या रामचंद्र परब यांनी 364 मते मिळवून विजय मिळवला. तर शिवसेनेच्या अमित राणे यांना 313 मते मिळाली व त्यांचा पराभव झाला. तर नोटा 9 मते मिळुन एकुण 686 मतदान झाले.

प्रभाग क्र. १ कविलकाटे (सर्वसाधारण महीला)
१) सखु आकेरकर (भाजप) (विजयी)
२) रंजना जळवी (काँग्रेस)
३) ज्योती जळवी (शिवसेना) विजयी

प्रभाग क्र. २ भैरववाडी (सर्वसाधारण महीला)
१) नयना मांजरेकर (भाजप) (विजयी)

प्रभाग क्र.3 लक्ष्मीवाडी (सर्वसाधारण महिला)
१) चांदणी कांबळी (भाजप) (विजयी)
२)अश्विनी पाटील (शिवसेना)

प्रभाग क्र. ४ बाजारपेठ (सर्वसाधारण महीला)
१) रेखा काणेकर (भाजप)
२) श्रुती वर्दम (शिवसेना) विजयी
३) सोनल सावंत (काँग्रेस)
४) मृण्मयी धुरी (अपक्ष)

प्रभाग क्रमांक ५ कुडाळेश्वर वाडी (सर्वसाधारण)
१) अभिषेक गावडे (भाजप) (विजयी)
२) प्रवीण राऊळ (शिवसेना)
३) सुनील बांदेकर (अपक्ष)
४) रमाकांत नाईक (मनसे)
५) रोहन काणेकर (काँग्रेस)

प्रभाग क्र. ६ गांधीचौक (सर्वसाधारण महीला)
१) प्राजक्ता बांदेकर (भाजप) (विजयी)
२) देविका बांदेकर (शिवसेना)
३) शुभांगी काळसेकर (काँग्रेस)
४) आदिती सावंत (अपक्ष )

प्रभाग क्र. ७ डाॅ. आंबेडकर नगर (सर्वसाधारण)
१) विलास कुडाळकर (भाजप) (विजयी)
२) भूषण कुडाळकर (शिवसेना)
३) मयूर शारबिद्रे (काँग्रेस

प्रभाग क्र. ८ मस्जिद मोहल्ला (सर्वसाधारण महीला)
१) मानसीसावंत (राष्ट्रवादी काँग्रेस) (विजयी)
२) रेवती राणे (भाजप)
३) आफरीन करोल (काँग्रेस)

प्रभाग क्र. 9 नाबरवाडी (सर्वसाधारण महीला),
१) साक्षी सावंत (भाजप)
२) श्रेया गवंडे (शिवसेना) विजयी

प्रभाग क्र 10 केळबाईवाडी (सर्वसाधारण महिला)
१) प्रांजल कुडाळकर (शिवसेना),
२) रीना पडते (भाजप)
३) अक्षता खटावकर (काँग्रेस) (विजयी)

प्रभाग क्र. 11 गणेश नगर (अनु. जाती सर्वसाधारण )
१) गुरुनाथ गडेकर (शिवसेना)
२) राजीव कुडाळकर (भाजप)विजयी
३) सिद्धार्थ कुडाळकर (काँग्रेस)

प्रभाग क्र.12 हिंदु काॅलनी (सर्वसाधारण)
१) संध्या तेरसे (भाजप) (विजयी)
२) हेमंत कुडाळकर (राष्ट्रवादी काँग्रे

प्रभाग क्र.13 श्रीरामवाडी (सर्वसाधारण महीला)
१) सई काळप (शिवसेना) (विजयी)
२) तेजस्विनी वैद्य (भाजप)
३) विमल राऊळ (काँग्रेस)

प्रभाग क्र.14 अभिनव नगर (सर्वसाधारण)
१) प्रज्ञा राणे (भाजप)
२) मंदार शिरसाट (शिवसेना) विजयी
३) केतन पडते (काँग्रेस)

प्रभाग क्र. 15 कुंभारवाडी (सर्वसाधारण)
१) प्रशांत राणे (भाजप)
२) गणेश भोगटे (काँग्रेस)
३) उदय मांजरेकर (शिवसेना)विजयी

प्रभाग क्र 16 एम.आय.डी.सी. (सर्वसाधारण)
१) किरण शिंदे (शिवसेना) (विजयी)
२) सहदेव पावसकर (मनसे)

प्रभाग क्र. 17 सांगिर्डेवाडी (सर्वसाधारण)
१) रामचंद्र परब (भाजप) (विजयी)
२) अमित राणे (शिवसेना),

कुडाळ-भाजप 8 , शिवसेना 7 व काँग्रेस 02

जाहिरात4