देवरुख आगार व्यवस्थापक यांचेवर गुन्हा दाखल करून निलंबन व्हावे

संगमेश्वर तालुका भाजपाची मागणी
उद्या देवरुख पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करणार

देवरुख । प्रतिनिधी

देवरुख आगारातील कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे याकरिता कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन व आक्षेपार्ह विधान व धार्मिक भावना दुखावून जातीय तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करणाऱ्या देवरुख आगार व्यवस्थापकांना वर कारवाई करण्यात यावी व त्यांचे तत्काल निलंबन व्हावे अशी मागणी संगमेश्वर भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेत मंगळवारी करण्यात आली. या अधिकाऱ्याच्या विरोधात १९ रोजी देवरुख पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी दिली आहे.

ही पत्रपरिषद भाजपा पक्षाच्या देवरुख कार्यालयात तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी घेतली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सुशांत मुळे, ज्येष्ठ नेते मुकुंद जोशी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तुकाराम किरवे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपेश कदम, पंढरीनाथ मोहीरे, अमोल गायकर, महेश आंबेकर आदी उपस्थित होते. संपामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सेवेमध्ये रुजू होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रत्येक आगाराला आदेश प्राप्त झाले आहेत. यानुसार कारवाई होऊ नये आणि कर्मचाऱ्यांनी कामावरती रुजू व्हावे यासाठी देवरुख आगार व्यवस्थापक सागर गाडे हे कर्मचा-यांच्या घरी जाऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र समजण्याची त्यांची ही रीतच न्यारी असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी पत्रपरिषदेत स्पष्ठ केले. यावेळी आगार व्यवस्थापकांच्या आक्षेपार्ह विधान याचा पाढाच त्यांनी पत्रकारांसमोर मांडला.

आक्षेपार्ह विधान , जातीय सलोखा बिघडवणारी वक्तव्य आणि एखाद्या राजकीय पुढारी प्रमाणे त्यांची असलेली भूमिका या साऱ्या गोष्टी मनात चीड निर्माण करणारे आहेत. प्रशासकीय अधिकार्‍यांकडून अशाप्रकारे पुढारी वर्तन हे अशोभनीय असल्याचे अधटराव यांनी व्हिडीओ क्लिप च्या माध्यमातून पत्रकारांसमोर स्पष्ट केले. त्यांच्या या बेताल वर्तनाबद्दल आगार व्यवस्थापक यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. १९ रोजी देवरुख पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.

तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा देखिल भाजपतर्फे यावेळी निषेध करण्यात आला. या बाबतही देऊन पोलिस ठाण्यात पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
तसेच कोरोनाचा पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून निर्बंध घातले ते चुकीचे आहेत. यामध्ये सर्व सामान्यांचे सर्वाधिक नुकसान होत असल्याचे अधटराव यांनी स्पस्ट केले.

जाहिरात4