रत्नागिरी Corona Updates : नवे रुग्ण ३०४ ; मृत्यू ० ; एकूण उपचाराखाली रुग्ण ११७४; ऑक्सिजनावर ८; आयसीयु ५ रुग्ण

रत्नागिरी । प्रतिनिधी :
मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून आली. ३०४ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. १५०० जणांच्या स्वॅब तपासणीत हा अहवाल आला आहे. जिल्ह्यात सध्या ११७४ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. आजच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद चिपळूण मध्ये ९७ आणि रत्नागिरी तालुक्यात ६८ इतकी झाली आहे.

नव्या ३०४ रुग्णांमुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधित रुग्णांची संख्या ८१६८३ असून त्यातील ७७९६९ जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४५%.

२४ तासात एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही मात्र आतापर्यंत २४९५ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ११७४ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. त्यातील ९४६ रुग्ण गृह विलगिकरणामध्ये उपचार घेत आहेत. हे प्रमाण ८०.५८ % इतके आहे.  रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी ऑक्सिजनावर ८ तर आय सी यु मध्ये ५ रुग्ण उपचार घेत आहेत.

तालुकानिहाय आकडेवारीमध्ये मंडणगड १३, दापोली २३, खेड ३७, गुहागर २३, चिपळूण ९७, संगमेश्वर २१, रत्नागिरी ६८, लांजा ९, राजापूर १३.

जाहिरात4