रत्नागिरी Corona Updates : नवे रुग्ण १४७ ; मृत्यू ३ ; एकूण उपचाराखाली रुग्ण ११०८; ऑक्सिजनावर १०; आयसीयु ० रुग्ण

रत्नागिरी । प्रतिनिधी :
सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून आली. सोमवारी १४७ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ८२८ जणांच्या स्वॅब तपासणीत हा अहवाल आला आहे. मात्र तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ११०८ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. आजच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद रत्नागिरी तालुक्यात ५२ इतकी झाली आहे.

नव्या १४७ रुग्णांमुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधित रुग्णांची संख्या ८१३७९ असून त्यातील ७७७७४ जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५७%.

२४ तासात 3 बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २४९५ जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात ११०८ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. त्यातील ८९९ रुग्ण गृह विलगिकरणामध्ये उपचार घेत आहेत. हे प्रमाण ८१.१४ % इतके आहे.  रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी ऑक्सिजनावर १० तर आय सी यु मध्ये एकही रुग्ण नाही.

तालुकानिहाय आकडेवारीमध्ये मंडणगड १, दापोली ६, खेड ३६, गुहागर ६, चिपळूण २४, संगमेश्वर १२, रत्नागिरी ५२, लांजा ३, राजापूर ७.

जाहिरात4