रत्नागिरी Corona Updates : नवे रुग्ण २०७ ; मृत्यू ० ; एकूण उपचाराखाली रुग्ण १०६५; ऑक्सिजनावर १०; आयसीयु ० रुग्ण

रत्नागिरी । प्रतिनिधी :
रविवारी रत्नागिरी जिल्ह्यात २०७ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. १४६८ जणांच्या स्वॅब तपासणीत हा अहवाल आला आहे. जिल्ह्यात सध्या १०६५ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. आजच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद चिपळूणमध्ये ७७,रत्नागिरी तालुक्यात ५७ इतकी झाली आहे.

नव्या २०७ रुग्णांमुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधित रुग्णांची संख्या ८१२३५ असून त्यातील ७७५२८ जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४४%.

२४ तासात एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही मात्र आतापर्यंत २४९२ जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात १०६५ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. त्यातील ८५५ रुग्ण गृह विलगिकरणामध्ये उपचार घेत आहेत. हे प्रमाण ८०.२८% इतके आहे.  रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी ऑक्सिजनावर १० तर आय सी यु मध्ये एकही रुग्ण नाही.

तालुकानिहाय आकडेवारीमध्ये मंडणगड ९, दापोली १६, खेड २०, गुहागर २४, चिपळूण ६०, संगमेश्वर १३, रत्नागिरी ५३, लांजा ४, राजापूर ८.

*जिल्हा रत्नागिरी | कोविड-१९ लसीकरण*
*दिनांक 15-01-2022*

आजचे लसीकरण सत्र – *04*
1st डोस : *11*
2nd डोस : *232*
*आज झालेले १८+ लसीकरण – 243*

*आज अखेर झालेले एकूण लसीकरण -*
1st डोस – *1040464*
2nd डोस – *780738*
एकूण – *1821202*

जाहिरात4