मंडणगड तालुक्यात अवैध गुटख्यावर पोलिसांची धडक कारवाई एक जण ताब्यात

मंडणगड । प्रतिनिधी

मंडणगड तालुक्यात गुटख्याची अवैद्य वाहतूक करताना मंडणगड पोलिसांनी एकाला ताब्यात घेत सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

याबाबत अधिक माहिती अशी की मंडणगड एसटी स्थानक परिसरात गुरुवार दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी तीन मिनिटाच्या दरम्यान एसटी स्टँड समोरील चौकात बेकायदेशीरपणे महिंद्रा मॅक्झिमो गाडी क्रमांक एम एच ०७ डब्ल्यू २६०७ या चारचाकी वाहनातून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करीत असताना कमल कांत सागरमल गोयल वय 41 वर्ष राहणार काळकाई कोंडा तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी याला मंडणगड पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडे सुमारे ८ हजार 216 रुपये इतक्या किमतीचा गुटका पोलिसांनी हस्तगत केला आहे या आरोपीविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात भांदरी कलम 328, 272, 273 ,188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल धनंजय शांताराम सावंत यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात दिली आहे

तसेच संशयित आरोपी ची चार चाकी महिंद्रा मॅक्झिमो ही गाडी जप्त करण्यात आले आहे याबाबतचा अधिक तपास मंडणगड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शैलेजा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू या गाडीमध्ये केसर युक्त विमल पान मसाला यापान मसाल्याचे 8712 रुपये किमतीची पाकिटे पोलिसांना आढळून आले आहेत