तिलारी घाटात टेम्पो व पिकअपमध्ये अपघात

दोडामार्ग | सुहास देसाई

बेळगाव ते दोडामार्ग अशी वाहतूक करणारा टाटा टेम्पो तिलारी घाटातील अवघड वळणावर महिंद्रा बोलेरो पिकअप याच्यात अपघात झाला. दोन्ही गाड्या अंदाजे हजार फूट दरीत कोसळण्यापासून सुदैवाने बचावल्या. केवळ दैव बलवत्तर म्हणून दोन्ही गाड्यातील चालक व क्लिनर दोन्ही सुखरूप बचावले सदर घाटात ब्रेक निकामी झाल्याने बोलेरो पिकप गाडी चा अपघात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे तर टाटा टेम्पोला शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला.असल्याचे सांगण्यात आले आहे.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg


दरम्यान आज महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी ग सायंकाळच्या सुमारास तिलारी घाट उतरत होती. त्यावेळी जयकर पॉइंट येथे गाडी आली असता गाडीचा ब्रेक अचानक निकामी झाल्याने गाडीला अपघात झाला. हि गाडी सुमारे १०० फूट खाली कोसळली. दोन्ही चालक व क्लीनर अंदाजे हजार फूट दरीत कोसळण्यापासून बालंबाल बचावली. यात गाडीचे व मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून गाडीचा चालक व क्लिनर सुखरूप वाचले. टाटा टेम्पो शुक्रवारी दुपारी घाट उतरत होता. दरम्यान त्याच जयकर पॉईंट जवळ येताच या टेम्पोचे सुद्धा अचानक ब्रेक निकामी झाले.


त्यानंतर चालक व त्याच्यासोबत असलेल्या क्लिनरने टेम्पोतून बाहेर उडी मारली व स्वतःचा जीव वाचविला. मात्र टेम्पो थेट जात संरक्षक कठडा तोडून बाहेर गेला. तो टेम्पो झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला.या अपघाताने तिलारी ओव्हरलोड वाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असते त्यामुळे प्रशासन कोणती कारवाई करते याकडे लक्ष लागून राहिले आहे