कणकवलीत झाला व्यापारी एकता मेळाव्याच्या कार्यालयाचा शुभारंभ…!

    

संतोष राऊळ | कणकवली
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३१ जानेवारी रोजी कणकवलीत येथे ऑनलाइन व्यापारी एकता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर कणकवली शहरात बेलवलकर ज्वेलर्स शेजारील गाळ्यात आज मेळाव्याचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे .याचा शुभारंभ ज्येष्ठ व्यापारी विजय कोदे यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्याचे नीटनेटके व सुसज्ज नियोजन व्हावे तसेच या कार्यालयाच्या माध्यमातून विविधांगी तसेच नियोजनाबाबतच्या कामकाजाबाबतची माहिती व रूपरेषा ठरवण्याच्या दृष्टीने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर यांनी दिली
याप्रसंगी व्यापारी जिल्हा सेक्रेटरी नितीन वाळके,उपाध्यक्ष राजन पारकर,मोहन तळगावकर,भाऊ काणेकर,राजू गवाणकर,बंडू खोत,राजा राजाध्यक्ष, महेश कुडाळकर, बाळू मोरये, सतीश मसुरकर आदी पदाधिकारी व्यापारी उपस्थित होते.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg