रत्नागिरी Corona Updates : नवे रुग्ण २३५ ; मृत्यू ० ; एकूण उपचाराखाली रुग्ण ९६०; ऑक्सिजनावर १०; आय सी यु ० रुग्ण

रत्नागिरी । प्रतिनिधी :
शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यात २३५ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. १८४१ जणांच्या स्वॅब तपासणीत हा अहवाल आला आहे. जिल्ह्यात सध्या ९६० जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. आजच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद चिपळूणमध्ये ६२,रत्नागिरी तालुक्यात ६० इतकी झाली आहे.

नव्या २०९ रुग्नांमुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधित रुग्णांची संख्या ८०८०१ असून त्यातील ७७२९४ जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६६%.
२४ तासात एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही मात्र आतापर्यंत २४९२ जणांचा मृत्यू झाला.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

जिल्ह्यात ९६० जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. त्यातील ७६२ रुग्ण गृह विलगिकरणामध्ये उपचार घेत आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी ऑक्सिजनावर १० तर आय सी यु मध्ये एकही रुग्ण नाही.

तालुकानिहाय आकडेवारीमध्ये मंडणगड ५, दापोली २९, खेड २१, गुहागर २४, चिपळूण ६२, संगमेश्वर २४, रत्नागिरी ६०, लांजा ४, राजापूर ६.