महामार्ग ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपाचा प्रजासत्ताकदिनी उपोषणाचा ईशारा

कोंढेतड माजी उपसरपंच अरविंद लांजेकरही करणार उपोषण

राजापूर । वार्ताहर

अत्यंत मनमानी पध्दतीने सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाकडे शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने आता या विरोधात जनतेतून उठाव सुरू झाला आहे. महामार्गाचे रखडलेले काम, निकृष्ट दर्जा, निष्काळजीपणा आणि ठेकेदाराच्या मुजोरीच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसण्याचा ईशारा राजापूर तालुका भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

तसे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी प्रांताधिकारी राजापूर यांना सादर केले आहे. तर भाजपाचे युवा मोर्चा सरचिटणीस आणि कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनीही याबाबत स्वतंत्र निवेदन देत प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा ईशारा दिला आहे.
या निवेदनात राजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ चे काम अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना व नागरीकांना त्याचा फटका बसत आहे. केंद्र शासनाने या महामागार्साठी हजारो कोटींचा विकास निधी दिला असून देखील राष्ट्रीय महामागार्चे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गामध्ये वर खाली उंचवटे असल्याने वाहने व प्रवाशांना शारिरिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अशा उंचसखल रस्त्यामुळे रूग्णवाहिकेतून जाणाऱ्या रुग्णांना विशेषता गरोदार महिलांना त्याचा त्रास होत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

तसेच महामागार्चे काम निकृष्ट दजार्चे असल्यामुळे अनेक ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढून त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या नागरीकांच्या संख्येमध्येही भर पडत आहे. त्यामुळे सदरचा महामार्ग हा काम पुर्ण होण्यापुर्वी सुद्धा दिवसेंदिवस मृत्युचा सापळा बनत चाललेला आहे. तसेच सदर कंत्राटराने अयोग्य रितीने केलेल्या कामामुळे सदर राष्ट्रीय महामार्ग लगत असणा या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेत जमिनी नापिक होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन हिरावले आहे.

शासनामार्फत विकास कामांसाठी वापरला जाणारा निधी हा सामान्य नागरीकांनी शासनाला दिलेल्या करारांमधूनच खर्च केला जातो. त्यामुळे ही शासनाची तसेच नागरीकांची घोर फसवणूक आहे. उपरोक्त परिस्थिती बाबत वारंवार निवेदन तसेच तक्रारी देऊन देखील संबधीत ठेकेदार दुर्लक्ष करत असल्यामुळे सदर राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदारांच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी भारतीय जनता पाटीर्चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणाला बसणार असल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आले.

महामार्ग ठेकेदाराच्या मनमानीबाबत दै. प्रहारने सातत्याने वृत्त प्रसिध्द करून आवाज उठविला आहे. मात्र मुजोर ठेकेदार कोणासह जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता जनतेतून उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजपाचे युवा मोर्चा सरचिटणीस आणि कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यानी स्वतंत्र निवेदन देत महामार्ग कामातील त्रृटी निदर्शनास आणून दिल्या आहेत.