कोरोनामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांस सानुग्रह सहाय्य प्रदान करण्याबाबत बैठक संपन्न

रत्नागिरी |

रत्नागिरी जिल्हयात कोव्हीड 19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांस सानुग्रह सहाय्य प्रदान करण्याबाबतच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे संपन्न झाली.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभीयंता छाया नाईक, पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये आदि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी याअनुषंगाने आतापर्यंत प्राप्त अर्ज, छाननी, दिलेल्या लाभासंदर्भात आढावा घेतला. संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरचे अर्ज लवकरात लवकर निकाली काढवेत अशा सचूना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हयात कोव्हीड 19 या आजारामुळे निधन पावलेल्या ज्या व्यक्तींच्या वारसदारांनी सानुग्रह सहाय्य साठी अर्ज केलेले नसतील त्यांनी स्वत: www.mahacovid१९relief.in या पोर्टलवर Online अर्ज दाखल करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी यावेळी केले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सुर्यवंशी यांनी यावेळी प्राप्त अर्ज, निकाली काढलेल्या अर्जांसदर्भात माहिती दिली.