सावर्डे येथे उद्या स्व. गोविंदरावजी निकम जयंती महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा

चिपळूण | प्रतिनिधी

सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी स्व.गोविंदरावजी निकम यांची ८६ वी जयंती १६ जानेवारी रोजी सावर्डे येथील स्मृतिगंध या शिक्षणमहर्षी स्व. गोविंदराव निकम स्मारक स्थळी covid-19 संदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून साजरी करण्यात येणार आहे. हा जयंती महोत्सव सोहळा सकाळी १० वाजता डॉ. बी. एन. पाटील (भा.प्र.से.), रत्नागिरी जिल्हाधिकारी व मा.डॉ. अरुण पाटील, कुलगुरु, संजय घोडावत विद्यापीठ (SGU), कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित केला आहे.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

स्व. गोविंदराव निकम व स्व. अनुराधा निकम यांच्या जीवनातील विविध घटना म्हणजेच जीवनगाथा स्मारकस्थळी शिलालेखावर कोरण्यात आलेले आहेत. आजच्या युवा पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून सुबक शिलालेख तयार करण्यात आलेले आहेत, त्याचे उद्घाटन याच दिवशी सकाळी दहा वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील (भा.प्र.से)यांच्या हस्ते होणार आहे. सह्याद्रि शिक्षण संस्था सावर्डे मार्फत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना दरवर्षी शिक्षणमहर्षी स्व. गोविंदराव निकम पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी हा पुरस्कार कोवॅस संस्था, चिपळूण (२०१३), जानकीबाई महिलाआश्रम, लांजे (२०१४), सह्याद्रि निसर्ग मित्र, चिपळूण (२०१५), यश स्नेहा ट्रस्ट, घराडी, मंडणगड (२०१६), स्नेहदीप, दापोली (२०१७), बलशाली युवा हृदय मंच (२०१८), श्रमीक सहयोग, चिपळूण (२०१९) भारतीय समाज सेवा केंद्र शाखा: चिपळूण (२०२०), कै. ति. सौ. अनसूया आनंदी महिला वृध्दाश्रम, पावस (२०२१) या सामाजिक संस्थांना प्रदान करण्यात आलेला आहे. सन २०२२ चा शिक्षणमहर्षी स्व. गोविंदराव निकम पुरस्कारासाठी निवड समितीने कै.ति.सौ. अनसूया आनंदी महिला वृध्दाश्रम पावस या संस्थेची निवड केली आहे. पुरस्काराचे स्वरुप २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असून या पुरस्काराचे स्वरूप आहे.

याप्रसंगी रंगबहार संस्था कोल्हापूर यांच्यावतीने जीवनभर कलासाधना करून कलाक्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या कलाकारस कै. चित्रकार श्यामकांत जाधव जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रकाश राजेशिर्के यांना प्राप्त झाला असून याच दिवशी संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच श्रीमती अश्विनी महाडिक यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून राष्ट्रीय खेळाडू इशा पवार, प्रथमेश सुर्वे तसेच कर्मचारी मंगेश गुरव, दिलीप गुरव व राजेंद्र कोळपे यांना रोशन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या ८६ व्या जयंती सोहळ्यास सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सोहळा समितीचे आयोजकांकडून करण्यात आले आहे.