औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धेत अमेय लोहार जिल्ह्यात प्रथम

चिपळूण | वार्ताहर

जेएसडब्ल्यू फाउंडेशन व रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होते. या स्पर्धेत लवेल विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वनाथ विद्यालय लावेल (ता. खेड) येथील आठवीतील विद्यार्थी अमेय अनिल लोहार याने सहावी ते आठवी गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विज्ञान शिक्षकांसह मुख्याध्यापकांचे त्याला मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. अविनाश बेडेकर, व्हाईस चेअरमन मामा तळेकर, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक प्रकाश कदम व सहकारी शिक्षक व ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg