काँग्रेसने केला डिजिटल सभासद नोंदणीचा शुभारंभ

रत्नागिरी | प्रतिनीधी :

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अविनाश लाड साहेब आणि निरीक्षक ॲड गुलाबराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची डिजिटल सभासद नोंदणीची सुरुवात काँग्रेस भवन येथे मोठ्या उस्तहाने सुरुवात झाली.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

सदर बैठकीमध्ये डिजिटल सभासद नोंदणी करण्याची माहिती देऊन घरा घरात पोचून रत्नागिरी जिल्हा मध्ये सर्वात जास्त सभासद नोंदणी करण्याचा निश्चय करण्याचा सूतोवाच जिल्हाध्यक्ष अविनाश लाड आणि निरीक्षक ॲड गुलाबराव घोरपडे यांनी केला.तसेच मा.आमदार हुस्नाबानु खलिपे यांनी या कार्यक्रमास पूर्णपणे सहकार्य करून यशस्वी करण्याचे ग्वाही देण्यात आली.

तदप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव,जिल्हा उपाध्यक्ष राजेश पतियानी,जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर,प्रदीप साळवी, महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत,महिला जिल्हाध्यक्ष ॲड अश्विनी आगाशे,सेवादल जिल्हाध्यक्ष अन्वर काद्री, मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर,महिला जिल्हा उपाध्यक्ष रविना गुजर, तालुकाध्यक्ष प्रशांत यादव,दत्ता परकर,सुभाष बाकळकर,महिला तालुकाध्यक्ष रिझवणा शेख,रवींद्र खेडेकर,युवकचे चेतन नवरंगे,गजानन पिलंकर,राजेश आयारे,इत्यादी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.*