बांदा स्मशानभूमी नजीक डंपर व कार यांच्यात अपघात

बांदा | प्रविण परब
बांदा स्मशानभूमी नजीक हॉटेल कावेरी समोर डंपर व कार यांच्यात आज सकाळी समोरासमोर अपघात झाला. महामार्गाचे काम सुरु असल्याने सध्या वनवे वाहतूक सुरु आहे. कारचालकाने बांद्याच्या दिशेने येण्यासाठी कार मध्येच घुसविली असताना समोरुन गोव्याच्या दिशेने येणाऱ्या डंपरची ठोकर बसली. यात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. डंपर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिकांच्या सहकार्याने दोन्ही वाहने बाजूला करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.