विनापरवानगी ओबीसी मोर्चा काढणाऱ्या आयोजकांची जातमुचलक्यावर न्यायालयाने केली मुक्तता

रत्नागिरी । प्रतिनिधी
प्रशासनाची परवानगी न घेता मोर्चा काढल्याप्रकरणी ओबीसी समन्वय समितीच्या आयोजकांची न्यायालयाने गुरुवारी जातमुचलक्यावर मुक्तता केली.

ओबीसी समाजाचे रद्द करण्यात आलेले आरक्षण तसेच ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात 26 नोव्हेंबर रोजी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असे मोर्चाचे स्वरूप होते. याप्रकरणी एकूण 20 हुन अधिक जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

यामध्ये ओबीसी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गिते, कुमार शेट्ये, संतोष सोलकर, प्रकाश साळवी, नंदकुमार मोहिते,राजीव किर, दीपक राऊत, तानाजी कुळ्ये, सुजित झिमण, संतोष थेराडे, अविनाश लाड, संदीप राजपुरे, रघुवीर शेलार, सुधीर वासावे, चंद्रकांत बावकर, प्रकाश मांडवकर, दौलतराव पोस्तुरे, संतोष गवळे आदींचा समावेश होता.