ग्रामसेवक युनियन तालुका शाखा कणकवली मार्फत कोळोशी येथे वनराई बंधारा-

कणकवली l चंद्रशेखर तांबट :

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या कणकवली शाखे मार्फत कोळोशी वरची धनगरवाडी येथे वनराई बंधारा घालण्यात आला.शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दरवर्षी कणकवली तालुक्यात मोठ्या संख्येने वनराई तसेच कच्चे बंधारे घालून शेती तसेच जनावरांकरिता नदी वहाळातील पाणी ग्रामपंचायतीकडून अडविले जाते याच सामाजिक जाणिवेतून कणकवली तालुक्यातील सर्व ग्रामसेवक एकत्र येऊन बंधारा घालतात.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

युनियन मार्फत कोळोशी गावी घालण्यात आलेल्या बंधाऱ्याचे ठिकाणी कणकवली पंचायत समितीचे सभापती  मनोज रावराणे,पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके, बिडिओ श्री.हजारे साहेब, कृषी अधिकारी पवारसाहेब, पंचायत समिती चे अधिकारी वर्ग,कोळोशी सरपंच रितिका सावंत, ओटव सरपंच हेमंत परुळेकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, सावडाव सरपंच दत्ता काटे, आयनल सरपंच बापू फाटक तसेच कोळोशी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.तसेच आज राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात आली.यानिमित्ताने कर्तृत्ववान महिला म्हणून माजी सरपंच सुचिता पोकळे यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव दीपक तेंडुलकर यांनी केले.