सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंचे रत्नागिरी जल्लोष- ओपन मॅरेथॉन स्पर्धेत यश

स्वराज जोशी, रिया गुजर व श्रेयस ओकटे यांचे अभिनंदन करताना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक उदयराज कळंबे.
स्वराज जोशी व श्रेयश ओकटे जिल्ह्यात पहिले

चिपळूण | प्रतिनिधी

रत्नागिरी ॲथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने रत्नागिरी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय जल्लोष ओपन मॅरेथॉन स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे गुणी खेळाडू स्वराज जोशी, रिया गुजर आणि श्रेयश ओकटे यांनी १६ व १७ वर्षाखालील गटात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत स्वराज जोशीने १७ वर्षाखालील मुलांच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करीत तीन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धत प्रथम क्रमांक प्राप्त केला तर रिया गुजर हिने १७ वर्षाखालील मुलींच्या दोन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धत तृतीय क्रमांक प्राप्त केला आणि १६ वर्षाखालील मुलांच्या गटात श्रेयश ओकटे याने दोन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धत प्रथम क्रमांक प्राप्त केला.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

या स्पर्धेत जिल्हयातून अनेक खेळाडू सहभागी झाले होते. सावर्डेचे प्रतिनिधीत्व करताना संधीचे सोने करण्याची किमया स्वराज जोशी, रिया गुजर आणि श्रेयश ओकटे यांच्या माध्यमातून विद्यालयाला प्राप्त झाली. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक उदयराज कळंबे, अमृत कडगावे व रोहित गमरे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, संस्थेचे सचिव महेश महाडिक, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, सर्व संचालक व पदाधिकारी, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व मुख्याध्यापक अन्वर मोडक, उपमुख्याध्यापक विजय काटे, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, ज्युनिअर विभागाचे प्रमुख विजय चव्हाण, एम.सी.व्ही.सी विभाग प्रमुख सलीम मोडक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.