लांजात २८ ऑक्टोबरला ‘स्वरंगंधार’

लांजा । प्रतिनिधी

संस्कृती फाऊंडेशन लांजा-रत्नागिरीच्यावतीने दिवाळीचे औचित्य साधून खास लांजावासियांसाठी गीत, संगीत, नृत्य, नाटय आणि शिल्पकला यांचा संगम असलेला बहारदार असा कार्यक्रम ‘स्वरंगंधार’ हा सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

शहरातील हॉटेल किर्तीमहलच्या पटांगणावर सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. संस्कृती फाऊंडेशनच्यावतीन सलग ७ व्या वर्षी लांजातील रसिक प्रेक्षकांसाठी दिवाळी पाडावा संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत मैफिलीमध्ये संस्कृतीचे नेहमीचे राजेश गोसावी, स्वप्नाली पांचाळ, यासीन नेवरेकर, गुरू नांदगावकर, संजय पाटणकर, अभय पाध्ये, शुभांगी कुळये हे कलाकार गायन करणार आहेत. तर कुणाल पाटील, चेतन गावडे, ओंकार लांजेकर, अभिषेक गांधी व अजय घोगले हे कलाकार आपल्या नृत्याने कार्यक्रमात शोभा आणणार आहेत. तर लांजातील हरहुन्नरी मूर्तीकार नितीन जंगम यांच्या हस्तकौशल्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साकारली जाणार आहे. तर प्रख्यात मूर्तीकार धीरज साटविलकर हे पायाने चित्रकला साकारणार आहेत. सोबत कोकणचा बाज संगमेश्वरी फेम कलाकार सुनिल बेंडखळे व सचिन काळे तसेच सुनिल कलगुटकर व सहकारी रसिकांना खळखळूण हसविणार आहेत.

संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन योगेश शेटये करणार आहेत. कार्यक्रमासाठी संस्कृतीचे संस्थापक राजेश गोसावी, अध्यक्ष गौतम कांबळे, उपाध्यक्ष संतोष म्हेत्रे, सचिव विनोद बेनकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य मेहनत घेत आहेत.

जाहिरात4