इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला तर्फे साजरा झाला “इनरव्हील दिवस”….

सदस्यांनी एकत्र येऊन केली विचारांची देवाण-घेवाण

वेंगुर्ले :

इनरव्हील दिनाचे औचित्य साधून १० जानेवारीला वेंगुर्ला येथे “इनरव्हील दिवस” साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सर्व सदस्य एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी विचारांची देवाण-घेवाण करून कार्यक्रमात सहभाग घेतला.

इनरव्हील ची प्रार्थना सर्व प्रथम डॉ.सौ. पूजा कर्पे यांनी म्हटली. त्यानंतर अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सेक्रेटरीनी क्लब अध्यक्षांना काॅलर घातली. तद्नंतर गाॅंग वाजवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यात सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले.

तसेच सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पाहुण्या सौ. विभा सावंत व श्रीमती.जान्हवी सावंत यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना सिंधुताईं सारखं डोंगरा येवढं काम आपण करू शकत नाही. तरी पण ज्या समाजात आपण राहतो त्याचं आपण काही देणे लागतो त्या समाजाप्रती आपण काही काम करुन खारीचा वाटा आपण इनरव्हील च्या माध्यमातून उचलूया असे क्लबच्या सेक्रेटरी सौ. स्मिता दामले यांनी सांगितले.

नंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमास क्लब अध्यक्षा सौ.ज्योति देसाई, क्लब सेक्रेटरी सौ स्मीता दामले, आय. एस.ओ. सौ.वॄंदा गवंडळकर, एडीटर डॉ.सौ.पुजा कर्पे, उपाध्यक्षा सौ.अफशान कौरी, सदस्या सौ.आरती गिरप, सौ.अक्षया गिरप, सौ.अंकिता बांदेकर, सौ . श्रिया परब, सौ.सई चव्हाण, सौ.आकांक्षा परब व डॉ.सौ.दिपाली देसाई आदी उपस्थित होते.

जाहिरात4