जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर प्रथम

सावंतवाडी । प्रतिनिधी :

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत केंद्रशाळा बांदा नंबर एक मधील, इयत्ता तिसरी शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने पहिली ते सातवी या शालेय गटातून जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

यासाठी त्याला त्याचे आई-वडील श्री व सौ गौरी नितीन बांदेकर, केंद्र शाळा बांदा मधील समस्त शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका सरोज नाईक मॅडम, उपक्रमशील शिक्षक जे. डी पाटील सर, आणि वर्गशिक्षिका प्राजक्ता पाटील यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.

यापूर्वीही नीलने अभिनय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, कथाकथन स्पर्धा , चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक संपादन केले आहेत. त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात4