मिरकरवाडा येथे बोटीवरून पाय घसरून समुद्रात पडलेल्या खलाशाचा तीन दिवसांनी मिळाला मृतदेह

रत्नागिरी । प्रतिनिधी

शहरानजीकच्या मिरकरवाडा जेटी येथे एका बोटीवरुन दुसर्‍या बोटीवर उडी मारताना पाय घसरुन बोटीवर डोक आपटून पाण्यात बेपत्ता झालेल्या खलाशाचा मृत्यू झाला.ही घटना शुकवार 7 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा.घडली होती.या खलाशाचा मृतदेह रविवारी सकाळी 7.45 वा.मिळून आला.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

संजित फुलराम थारु चौधरी (20, मुळ रा.नेपाळ सध्या रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे.याबाबत सुबहान लियाकत मस्तान (26, रा.रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे खबर दिली आहे.त्यानूसार,शुक्रवारी सकाळी संजित चौधरी मिरकरवाडा जेटी येथील लियाकत मस्तान यांच्या बोटीवरुन दुसर्‍या बोटीवर जात असताना त्याचा पाय घसरला.त्यामुळे त्याचे डोके बोटीवर आपटून तो पाण्यात पडून बेपत्ता झाला होता.रविवारी सकाळी समुद्राच्या पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.