बांगलादेश : नदीत तीन मजली प्रवासी जहाजाला भीषण आग,३७ जणांचा होरपळून मृत्यू ; २०० पेक्षा अधिक जखमी

ढाका 
बांगलादेशातील सुगंधा नदीत आज पहाटे तीन मजली प्रवासी जहाजाला भीषण आग लागली. त्यात ३७ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून २०० पेक्षा अधिक जण भाजून जखमी झाले आहेत.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने यातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जाहिरात-3 https://prahaarkonkan.com/wp-content/uploads/2022/01/Untitled-500-x-300-px-1.jpg

ढाका येथून पश्चिमेला २५० किलोमीटरवर असलेल्या झलकाठी येथील सुगंधा नदीतून एमपी अभिजान-१० हे तीन मजली जहाज प्रवाशांना घेऊन पलीकडे जात होते. ती नदीच्या मध्यभागी आली तेव्हा तिच्या इंजिन रुमला आग लागली. त्यानंतर जहाजाला आग लागली. त्यात अनेक जण होरपळून ठार झाले. तर २०० पेक्षा अधिक जखमी झाले. या दुर्घटनेत ठार झालेल्या ३७ जणांचे मृतदेह सापडले आहेत. भाजलेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील ७२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, असे पोलीस उपायुक्त जोहोर अली यांनी सांगितले. पहाटे ३ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.