रत्नागिरी Breaking: गणपतीपुळे येथे एका पर्यटकाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी । प्रतिनिधी
तालुक्यातील गणपतीपुळे येथे फिरायला आलेल्या मुळ उत्‍तरप्रदेश मधील 5पर्यटकांपैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.तर चौघांना वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले असून त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ही घटना रविवार 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वा.सुमारास घडली.

रत्नाकर कल्पनाथ सरोज (24) असे बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. तर गोलू समरजित सरोज (26),रोहित संजिवन वर्मा (23),कपील रामशंकर वर्मा (28),मयुर सुधीर मिश्रा (28,सर्व मुळ रा.उत्‍तर प्रदेश सध्या रा.लोटे खेड,रत्नागिरी ) यांना वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले आहे. हे सर्व जण गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते.रविवारी सायंकाळी समुद्रस्नानाचा आस्वाद घेण्यासाठी ते समुद्रात गेले असता रत्नाकर सरोज यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाउ लागले.ही बाब त्यांच्या साथिदारांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली.त्यांचा आवाज ऐकून जीव रक्षक अक्षय माने,ओंकार गवाणकर,आशिष माने, अनिकेत राजवाडकर, मयुरेश देवरुखकर यांनी समुद्रात उड्या घेउन पाच ही जणांना पाण्याबाहेर काढले. परंतू,रत्नाकर सरोज यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

याबाबत गणपतीपुळे पोलिस ठाण्याचे मधुकर सरगर आणि सागर गिरीगोसावी यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केल्यानंतर रत्नाकर सरोज यांचा मृतदेह उत्‍तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.अधिक तपास पोलिस करत आहेत.

जाहिरात4