प्रेमाची लयलुट करणारा अवलिया-सुधाकर राणे

सावंतवाडी | राजाराम धुरी :
आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्त्येक थेंब आपल्याला काही ना काही देऊन जातो, शिकवून जातो … जेंव्हा तो तहानलेल्या धरतीवर पडतो… तेंव्हा तो मातीला एक वेगळाच गंध देऊन जातो… ओल्या मातीचा गंध… ‘देण्यात’ किती सामर्थ्य असतं हेच तो नकळत आपल्याला सांगून जातो… जेंव्हा तो झाडांच्या पानांवर पडतो… जास्त वेळ थांबत नसेलही तो तिथे… पण तरीही तो त्या पानांना अगदी टवटवीत करून जातो… ‘ओझरता स्पर्श’… ओझरत्या स्पर्शाची ताकद दाखवून जातो तो आपल्याला … कारण त्यात ‘लालसा’ नसते… त्यात असते एक अनामिक ‘ओढ’… अन् तीच आपल्याला टवटवीत ठेवते… अन् जेंव्हा तो तिच्या चेहऱ्यावर पडतो… तेंव्हा तेंव्हा राहतंच काय हो … तिच्या गालावरून खाली येतांना तर तो खुद्द बेभान होऊन जातो… बेधुंद ‘जगणं’ काय असतं हेच तो आपल्याला सांगून जातो…_
समाजात अशा थेंबा सारखी काही माणसे असतात त्याची वृत्ती त्याची ओळख बनते.
समाजातील रंजल्या गांजलेल्याना ते आपलेसे वाटतात मग मात्र शब्दात गुफण्याचा प्रयत्न होते
सावंतवाडीत फुलाचे व्यावसायिक म्हणुन असलेले राणे म्हणजे एक राजामाणुस.
संवेदनशील मनाने माणुसकीचे दर्शन घडवणारे म्हणून ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांना ओळखले जाते.

दशावतार ही त्याची आवड आणि ती जोपासताना केवळ लोक कलावंताकडे कलावंत म्हणून न पहाता ती ही माझ्या सारखीच माणसे आहेत याच भावनेतुन प्रसंगाच्या वेळी लोक कलावंताच्या मागे खंबीर उभे राहुन त्यांना समर्थ पणे आर्थिक मदत करताना ते दिसतात.
खर तर फुले विक्रेत्या कडून केवळ फुले विकायची अपेक्षा असते पण फुला सोबतच फुलासारखा किर्तीचा सुगंध पसरविण्याचे काम त्याच्या हातुन होते.


लोकांच्या भावना जाणत गरीब लोकांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याची किमया त्याच्या मोठ्या मनाचे द्योतक ठरते.
होतकरु विद्यार्थी ,आधार नसलेली माणसांची काठी होत तर कधी स्पर्धेत वा परीक्षेत यशस्वी झालेला एखादा माणुस असेल तर त्याला शाबासकीची थाप देत जिव्हाळ्याचे संबध प्रस्थापित करत फुलासोबतच आनंदाची लयलुट करणारा हा माणुस म्हणजे सुंदरनगरीतील एक अवलिया.

खर तर आपण किती जगलात यापेक्षा कसे जगलात हे खुप महत्वाचे असते आणि मग यातुनच समाजाला नविन वाट दाखवणारी माणसे मिळतात.
केवळ फुलविक्रेता म्हणुनच नाही तर तर अनेक नाती सामाजिक भावनेतुन निभवत फुलासोबतच भावनाची गुंतवणूक करणारे राणे हे आपल्या व्यावसायासाठी जितके प्रसिद्ध तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त एक निस्पुह ,निस्वार्था वृत्तीने मदत करणारे माणुस म्हणुन लोकपरिचित आहे.

पैशापलिकडे ही एक वेगळे जग असते ते फक्त आपल्याला बघता आले पहिजे आणि ते बघण्यासाठी आपल्याला माणुसकीची दृष्टी हवी याचा कृतीतुन संदेश देणारे सुधाकर राणे आपल्या व्यावसायासाठी लागणारी फुले बेळगाव,कोल्हापूर बेंगलोर, पुणे आदी ठिकाणाहून मागवतात .
हार-तुरे,तोरणे ,पुष्पगुच्छ आदी गोष्टी बनवताना “सेवा परम धर्म” या वृत्तीने जगतात म्हणून त्याना फायद्या पेक्षा ग्राहकांचे समाधान त्याना लाख मोलाचे वाटते.

आपण कोणासाठी काहीतरी केले पाहिजे हि त्याची मनोवृत्ती त्याच्या मनाचा मोठेपणा सिध्द करते.
आपले नाव कुठेही येत कामा नये ह्याची काळजी घेत व्यासपीठावर येण्याचा कधीच हव्यास न धरता आपल्या परिने लोकांच्या अडीअडचणीना समजुन जेवढी मदत करता येईल तेवढी करताना तर कधी एखाद्या च्या समस्येवर मार्ग काढतात . सुधाकर राणे यांना त्याचे कुंटुंबीय ही फुल विक्री व्यावसायात हातभार लावताना दिसतात.

यांच त्यांचा मुलगा साईगणेश पत्नी सुप्रिया आणि कन्या वैष्णवी ही महत्त्वाची भुमिका निभवतात.
अशा या सुधाकर राणे यांच्या फुलांच्या व्यापारातुन समाजसेवा हि नक्कीच आदर्शवादी उदाहरण आहे.

जाहिरात4