३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या त्या आत्महत्या नाहीत तर ठाकरे सरकारने केलेल्या त्या हत्याच..!

परिवहनमंत्र्यांवर हत्तेचा गुन्हा दाखल करा, केली मागणी

 

संतोष राऊळ | कणकवली 
३६ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या नाहीत तर ठाकरे सरकारने केलेल्या या हत्या आहेत.परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर हत्तेचा गुन्हा दाखल करा. या मंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारने योग्य निर्णय घेतला नाल्याने हो वेळ एसटी कामगारांवर आली आहे.जेव्हा हे मंत्री स्वतः अडचणीत येतात तेव्हा मुलींच्या शपथा घेतात मात्र एसटी कामगारांच्या मुलांची यांना काळजी नाही.त्याच्या मुलांना कोण संरक्षण देणार ? असा सवाल करत भाजपा आमदार नितेश राणे यांनी येणाऱ्या अधिवेशनात एसटी महामंडळ शासनात विलीन करण्यासाठी अपयशी सरकारला वठणीवर आणणार असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला.
कणकवली एसटी डेपोत संपात सहभागी झालेल्या एसटी कामगारांची आमदार नितेश राणे यांनी भेट घेतली.यावेळी ते कामगारांन समवेत बोलत होते.आमदार नितेश राणे म्हणाले, एसटी कामगार आमचा भाऊ ,बहीण आहे, जेथे जेथे गरज लागेल तुम्ही आम्हला हाक द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत.अधिवेशनात काय करू शकतो हे तुम्ही पाहिलेले आहे.या ही अधिवेशनात तुमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपा पक्ष म्हणून आम्ही भूमिका घेणार. न्यायालयाने समिती गठीत करण्याचे आणि जीआर काढण्याचे आदेश दिले आहेत मात्र तसे काहीच होत नाही.शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या केस मध्ये ना कोणती समिती ना काय मात्र सरकार त्याच्या साठी धावून गेले.एसटी कामगारांच्या मुलांसाठी हे सरकार येत नाही.कामगारांचे पगार वाढले तर त्यांचे कुटुंबीय चांगले जीवन जगू शकतात याकडे सरकार विचार करत नाही अशी टीका यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.

जाहिरात4