उदयोन्मुख भजनी बुवा अदिती धनावडे

गुहागर |प्रतिनिधी :

आपल्या अंगी असलेला छंद स्वस्थ बसू देत नाही, हेच खरे |शाळेपासून गुणगुणणारे संगीत जेव्हा ओठावर येते तेव्हा त्याला दाद ही मिळतेच… अशीच एक आवड जोपासली आहे गुहागर शहरातील खालचापाट येथील सौ. अदिती गणेश धनावडे हिने. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे धडे घेणाऱ्या अदितीने अल्पावधीलच गुहागरमध्ये उदयोन्मुख भजनी बुवा
होण्याचा मान प्राप्त केला आहे.

अदिती ही योगासन प्रशिक्षिका म्हणूनहि सर्वांना परिचित आहे. सौ. अदिती धनावडे ही गुहागर असगोली मधलीवाडीचे
सुपुत्र आणि मुंबई येथील माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ गोपाळ घुमे यांची मुलगी. संपूर्ण शिक्षण मुंबईतच झाले. वडील सुध्दा पोलीस सेवेत असताना मिळालेल्या वेळात त्यांनी संगीताची आवड जोपासली. एवढेच नव्हे तर आपली सेवा बजावतच असतानाच संगीत परीक्षा दिल्या आहेत.

अदिती ही मुंबईमध्ये योगा क्लासेस घेत असे. २०१० मध्ये अदिलीचे लग्न झाल्यावर ती गुहागर येथे आली. गुहागरसारख्या ठिकाणी योगा क्लासेसला म्हणावा तसा प्रतिसाद मिळणार नाही, हे तीने जाणले होते. घरी असताना लहानपणापासून गाळामध्ये गुणगुणारे शब्द ओठावर आले. आवाजाची स्तुती होऊ लागली. झालेली स्तुती अदितीला संगीत भजनी बुवा पर्यंत घेऊन गेली.मुंबईला आईकडे जात असे तेव्हा वडिलांकडून संगीताचे धडे  घेऊ लागली.

वडिलांनी संगीताची बाराखडीच तिच्याकडून तयार करून घेत होते. सासरच्या कुटुंबियांनी देखील अदितीच्या कलेला दाद देत प्रोत्साहन दिले आणि मग भजन सेवेला प्रारंभ केला. गुहागरमधील प्रसिध्द संगीत भजनी बुवा स्व. गंधाली सावरकर यांच्यानंतर अदिती हिने गुहागर शहरात संगीत भजनाची परंपरा पुढे नेत आहे. स्वर साधना महिला भजन मंडळाच्या माध्यमातून भजन सेवा सुरू केली. संगीत साधनेबरोबरच योग प्रशिक्षणहि सुरू केले आहे.

जाहिरात4