मळगांव बाजारपेठेतील मॉडर्न बेकरी आगीत भस्मसात

मळगांव बाजारपेठेतील मॉडर्न बेकरी आगीत भस्मसात
पहाटेची घटना । लाखोंचे नुकसान
सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव बाजार पेठ दत्तमंदिर लगत असलेल्या मॉडर्न बेकरीला आज पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या आगीत बेकरी जळून भस्मसात झाली. या अग्नितांडवात बेकरीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतेही कर्मचारी नसल्याने जीवितहानी मात्र टळली. स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. लगतच्या दुकानांना आगीची काही प्रमाणात झळ बसली मात्र मोठे नुकसान झाले नाही.

जाहिरात4