पकडलेल्या नौकांचा परवाना एक महिन्यासाठी रद्द तहसिलदारांचे आदेश

 

देवगड | प्रतिनिधी
अनधिकृतपणे आचरा व कुणकेश्वर किनाèयालगत सहा वावामध्ये मच्छिमारी करताना मत्स्यव्यवसाय विभागाने पकडलेल्या रत्नागिरी येथील दोन पर्ससीन नौकांना प्रत्येकी ५ हजार रूपये दंड व एक महिन्यासाठी परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.देवगड तहसिलदार मारूती कांबळे यांनी तसे आदेश दिले आहेत.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल गस्तीनौकेद्वारे गस्त घालत असताना सोमवारी सायंकाळी ५.३० वा.सुमारास आचरा व कुणकेश्वर समुद्रकिनाèयालगत सहा वावांमध्ये अनधिकृतपणे पर्सनेटद्वारे मच्छिमारी करीत असताना मत्स्यव्यवसाय विभागाने रत्नागिरी येथील दोन पर्सनेट नौका पकडल्या होत्या.\रत बानु करीम मुकादम यांच्या मालकीची अल करीम २ व अक्षता अशोक चव्हाण यांच्या मालकीची ओंकार असे त्या नौकांचे नाव होते.