दरवाजा बंद, खिडक्या बंद, शोकेस बंद तरीही मिठबांव हायस्कूलमधील टीव्ही संच चोरीस

सर्व बंद असताना चोरीस गेला कसा पोलिसांसमोर प्रश्न

देवगड | प्रतिनिधी
दरवाजा बंद, खिडक्या बंद, शोकेस बंद तरीही मिठबांव येथील रामेश्वर हायस्कूलमधील १० हजार रू पये qकमतीचा टीव्ही संच चोरीस गेल्याची घटना निदर्शनास आली आहे.चोरीचा गुन्हा देवगड पोलिस स्थानकात दाखल झाला आहे मात्र सर्व कुलूप लावून बंद असतानाही टीव्ही संच चोरीस गेला कसा असा प्रश्न पोलिसांसमोर पडला आहे.
मिठबांव येथील रामेश्वर हायस्कूलच्या चित्रकला हॉलमधील शोकेशमध्ये टीव्ही संच ठेवण्यात आला होता विशेष म्हणजे टीव्ही संच ठेवलेल्या शोकेशला कुलूप होते.कोरोना प्रादुर्भावामुळे हायस्कूल बंद होते.दि.१० ते ११ जुनच्या दरम्यान शाळेचे शिपाई पांडूरंग सुतार यांनी त्या हॉलमधील सा\स\ाई केली होती त्यावेळी टीव्ही संच होता.
त्यानंतर ४ ऑक्टोबर २०१२ रोजी शाळा सुरू झाली मात्र विद्यार्थी संख्या कमी असल्याने टीव्ही संच वापरला नाही.१३ ऑक्टोबर रोजी विद्याथ्र्यांची संख्या वाढल्याने टीव्ही संच वापरण्यासाठी शिक्षकांनी टीव्ही संच ठेवलेला चित्रकला हॉल शिपायांकडून उघडून घेतला यावेळी टीव्ही संच ठेवलेले शोकेसचे कुलूप उघडले त्यामध्ये तो मिळून आला नाही.
टीव्ही संच असलेल्या हॉलच्या दरवाजा खिडक्या बंद होत्या. असे असतानाही चोरी झाली कशी हा प्रश्न पोलिसांसमोर पडला आहे.दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक रमेश रघूनाथ राऊत यांनी अज्ञात चोरट्यांनी लाकडी झडपे असलेल्या खिडक्यांमधून प्रवेश करून शोकेसचे कुलूप बनावट चावीने उघडून टीव्ही संच चोरून नेला अशी तक्रार देवगड पोलिस स्थानकात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.तपास स.पो.उपनिरिक्षक दशरथ चव्हाण करीत आहेत.