वैभववाडी : 23 लाख लुटीचा रचला बनाव : ते कर्मचारीच निघाले चोरटे : पोलिसांना दिली कबुली

 

वैभववाडी । नरेंद्र कोलते
वैभववाडी येथील २३ लाख लुट प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. त्या दोन कर्मचाऱ्यांनीच लुटमारीचा बनाव केल्याचे पोलिसांसमोर आज सायंकाळी कबूल केले आहे. या लूट मारीत आणखी काही जणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. फिर्यादी कर्मचारी विठ्ठल खरात व सगुन केरवडेकर यांना घेऊन पोलिस अन्य साथीदारांच्या शोधात निघाले आहेत.