ओसरगाव जि.प. शाळा नं.१ च्या शतक महोत्सवी वर्षाचा झाला शुभारंभ

वर्षभरात विविध शैक्षणिक कार्यक्रम साजरे होणार

माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार, शाळेचा बदलला चेहरा मोहरा

अद्यावत संगणक कक्षाचे झाले उदघाटन, गेटचे ही झाले अनावरण

संतोष राऊळ | कणकवली :

ओसरगाव जि.प. शाळा न.१ चा शतक महोत्सव शुभारंभ आणि संगणक उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला.माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शतक महोत्सव वर्षाच्या कार्यक्रमांची सुरवात केली.येणाऱ्या नव्यापिढीला अद्यावत शिक्षण , इग्रंजी भाषेवर प्रभुत्व, अवकाश दर्शन कार्यशाळा, विज्ञान कार्यशाळा, संगणक ज्ञान, कलाकृती, वेगवेगळे उपक्रम राबवावेत या हेतूने शाळेचे माजी विद्यार्थी ॲड विलास परब यांचे नेतृत्वाखाली समिती स्थापन करुन आगळ्या वेगळ्या रितीने शतक मोहत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे. त्यासाठी निधी संकलनास सुरूवात केली. तलावाशेजारी हायवेनजिकची शाळा नजरेत भरावी , मुले शाळेत रमावीत अशा पध्दतीने शाळेचे रंगकाम, थोर पुरूषांची ओळख चित्रे , उत्कृष्ट गेट बांधणी, व्यासपीठ बांधणी इत्यादी स्वनिधीतून कामे केली आहेत.

अद्यावत संगणक कक्षाचे उदघाटन , गेटचे अनावरण नुतन जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ मुश्ताक शेख यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी सरपंच प्रमोद कावले यांच्या अध्यक्ष होते. जिप सदस्य सायली सावंत , पंस सदस्य मिलिंद मेस्री, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, केंद्र प्रमुख सुरेश हरकुळकर आदी उपस्थितीत होते.
शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा वाढता आलेख आणि माजी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेची केलेली उन्नती पाहून गौरवोदगार काढले. ही शाळा भविष्यात इतिहास घडवेल अशा शुभेच्छा दिल्या. हजारो मुलाना या शाळेने घडविले शिकविले. डॉक्टर , वकील, शासकीय अधिकारी, शिक्षक, भारतीय सैन्यात, खाजगी नोकरीत , व्यावसायिक , अभियंते, कंत्राटदार, व्यापार वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रात शाळेचे विद्यार्थी नावारूपास आहेत. असंख्य विद्यार्थी नोकरीनिमित्ताने मुंबईस्थित, परगावी आहेत. डॉ राजेश्वर उबाळे स्त्री रोग तज्ञ, डॉ हेमंत सावंत,ॲड विलास परब,उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे याच शाळेचे विद्यार्थी.शाळेचे पांग कधीच फिटणारे नाहीत. डॉ मोहीते यानी यापूर्वी लॕपटाॕप , बेंचेस प्रदान करून दातृत्व दाखविले आहे. महोत्सव शुभारंभी माजी विद्यार्थी श्री विलास राणे यांच्या कुटुंबिय, श्री हरिश्चंद्र मोरे, विठ्ठल राणे, विनायक पाटील यानी तिन संगणक शैक्षणिक साॕफ्टवेअर सहीत टेबल व बेंचेस देऊन शाळेप्रती प्रेम व नवपिढीस संगणकीय ज्ञान अवगत व्हावे हा हेतू ठेवला आहे. मधल्या काळात कोरोना विषाणू मुळे थोडा खंड पडला असला तरी ओसरगावातील या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळा सर्वांगाने समृद्ध करण्याचा चंग बांधल्याने शाळा अल्पावधीत नावारूपास येतेय. कोण म्हणतो जि प च्या शाळा मागे असतात? खाजगी शाळांकडे कल का वाढतो? हे सर्व प्रश्न आपल्या शाळेस लागू नाहीत असे काम होऊन शाळेची भरभराट व्हावी अशा एकमेव हेतूने समितीचे काम सुरूआहे . लहान थोर , पदाधिकारी असा कोणताही भेदभाव मनी न ठेवता माझी शाळा या विलक्षण भावनेने समान पातळीवर वागणे बोलणे, विचारांचे आदान प्रदान होत आहे . गतवर्षी मुलानी भाजी मार्केट भरवून मुलांना हिशोब, व्यापार आणि बोलणे चालणे याचे ज्ञान प्राप्त झाले. मुलानी आपली कमाई शाळेच्या प्रगतीसाठी दान करुन दातृत्वाचा धडा अंगिकारला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी विद्यार्थी शैलेश तांबे आणि आभारप्रदर्शन विवेक परब यानी केले. संगणक दाते विलास राणे यांचा सत्कार करण्यात आला. घनशाम राणे यानी मुलासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली.