सॅल्यूट टू शिपाई या उपक्रमाने चतुर्थ श्रेणी कर्मचारी भारावले

कुडाळ | प्रतिनिधी :

नाही फाईल उचलण्याचे काम….. नाही पाणी, चहा देण्याचे काम….. फक्त आणि फक्त….. मौज, मजा आणि एक दिवस उनाड साजरा केला तो कुडाळ पंचायत समितीच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी. निमित्त होते ते ‘सॅल्यूट टू शिपाई’ या उपक्रमाचे.

या उपक्रमाने चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांमध्ये एक नवी उमेद आणि उत्साह निर्माण झाला. कुडाळ पंचायत समितीच्यावतीने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सॅल्यूट टू शिपाई हा उपक्रम हाती घेण्यात आला होता या उपक्रमातून चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बद्दल कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी मानस होता आणि या माध्यमातून हा उपक्रम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी हाती घेतला. या उपक्रमाला पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांच्यासह सर्वच सदस्यांनी प्रतिसाद दिला आणि हा उपक्रम करण्यात आला.

नेहमी साहेबांची कामे ऐकणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कामे आज साहेब करीत होते यामध्ये गटविकास अधिकारी यांच्या वाहनावर चालक असणारे सुर्वे हे गटविकास अधिकारी यांना आणण्यासाठी त्यांच्या घरी गेले तेव्हा चालक श्री सुर्वे यांना औक्षण करण्यात आले त्यानंतर गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी स्वतः या गाडीचा ताबा घेऊन चालक सुर्वे यांना सोबतच्या सीटवर बसविले त्या ठिकाणाहून कुडाळपर्यंत गटविकास अधिकारी यांनी हे वाहन घेऊन आले त्यानंतर पंचायत समितीच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सर्व अस्थापना मधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पंचायत समितीच्या गेटवर स्वागत करण्यात आले त्यांना सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण या सर्वांनी कार्यालयाच्या दरवाजापर्यंत आणले त्यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव व औक्षण करण्यात आले.

सॅल्युट टू शिपाई या कार्यक्रमाच्या माध्यमातून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना बद्दल असलेली कृतज्ञता सर्वच कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली त्यानंतर या कर्मचाऱ्यांना विविध खेळाच्या माध्यमातून मनोरंजन करण्यात आले गायक समीर चराटकर व कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी या कर्मचाऱ्यांना हसते- खेळते केले त्यांच्या जीवनातील हा आनंदाचा आणि देहभान हरपून टाकणारा असा दिवस ठरला याबाबत काही चालक आणि शिपाई यांच्या बोलक्या प्रतिक्रिया आल्या एवढ्या वर्षांमध्ये आम्हाला कोणीच एवढा मान सन्मान दिला नाही. आमच्यासाठी खास कार्यक्रम आखला नाही. या कार्यक्रमामुळे आमचे मन भरून गेले आणि आमच्यामध्ये उत्साह, नवी उमेद निर्माण झाली असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला माजी सभापती राजन जाधव, पंचायत समिती सदस्य मथुरा राऊळ, श्रेया परब, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, बाव सरपंच नागेश परब, रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर तसेच कृषी अधिकारी बाळकृष्ण परब आदी उपस्थित होते.

पंचायत समिती सदस्यांनी धरला ठेका सॅल्यूट टू शिपाई या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना गायक समीर चराटकर यांनी नाचवले विविध गाण्यांचा ठेका धरीत चतुर्थ श्रेणी कर्मचारीही नाचले या सर्वांना साथ देण्यासाठी पंचायत समितीच्या सदस्या मथुरा राऊळ या नाचल्या.