माखजन बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य

माखजन | वार्ताहर :

संगमेश्वर तालुक्यातील माखजन एसटी बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानक परिसरात सर्वत्र खड्डे पडले असून ,पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त ,झाले आहे. एसटी चालकांना,बस नेमकी उभी कुठे करावी हा देखील प्रश्न पडत आहे. बस फेऱ्या पूर्ववत होत असताना,शाळकरी मुलांचा व इतर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.परंतु माखजन बसस्थानकातील अवस्था गंभीर बनत चालली आहे.या कडे एसटी महामंडळ दुर्लक्ष करीत असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र शब्दात नाराजीचे सूर उमटत आहेत.  माखजन बसस्थानाकातील झालेली दुर्दशा तातडीने सुधारण्यात यावी अशी मागणी होत आहे.