झाडगाव येथे सापडला विदेशी दारू साठा; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

प्रहार  डिजिटलच्या  व्हाट्सअँप ग्रुप ला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी | प्रतिनिधी :

शहरातील झाडगाव झोपडपट्टी येथे बेकायदेशिरपणे विदेशी दारुचा 1 हजार 400 रुपयांचा साठा विक्रीसाठी जवळ बागळल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.ही कारवाई सोमवार 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.25 वा.करण्यात आली.

बाळू आण्णाप्पा पाथरोड (52,रा.झाडगाव झोपडपट्टी,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात पोलिस नाईक दिपराज पाटील यांनी तक्रार दिली असून अधिक तपास पोलिस नाईक मोहिते करत आहेत.