बेकायदेशीर जुगाराविरुद्ध शहर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी | प्रतिनिधी :

शहरातील एसटी स्टँडलगत तसेच काजरघाटी येथील एसटी स्टॉपच्यामागे बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणार्‍या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.ही कारवाई सोमवार 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वा.करण्यात आली असून संशयितांकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 3 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आशिष अनिल लांजेकर (32,रा.तांबटआळी,रत्नागिरी) आणि संदिप गणपत चंदरकर (रा.शांतीनगर,रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेड काँस्टेबल बाळू पालकर आणि पोलिस हवालदार प्रशांत बोरकर यांनी तक्रार दिली असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.