जखमी वृध्दाला दिविजा वृध्दाश्रमाचा आसरा.

प्रहार  डिजिटलच्या  व्हाट्सअँप ग्रुप ला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा

सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी दाखविली बांधीलकी.

नांदगाव :

गेले महीनाभर कणकवली तालुक्यातील नांदगाव ति तरठा येथील ब्रिज खाली एक वयोवृद्ध व्यक्ती जखमी अवस्थेतच बसून घसटत फिरत असायचा पायाला जखम होवून अक्षरशः जीव पडले होते . आणि अशा अवस्थेत त्यांना असलदे गावातील स्वस्तीक फाउंडेशन च्या दिविजा वृध्दाश्रम च्या रांबाडे यांनी आसरा दिला आहे.

याबाबत अधिक वृत्त असं की, नांदगाव तिठा येथील ब्रिज खाली एक वयोवृद्ध व्यक्ती गेले महिनाभर जखमी अवस्थेतच बसून घसटत फिरत असायचा सदर व्यक्तीने आपले नाव गोपाळ सावंत ,म्हाळुंगे असे सांगितले आहे.त्यांना आज सकाळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर तसेच कणकवली पोलिस ठाण्याचे मनोज ऊर्फ बाळू गुरव ,राजू उबाळे , तसेच भाई मोरजकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विलास कांडर यांनी टेम्पो ची व्यवस्था करुन त्यांना सदर वाहनाने असलदे वृध्दाश्रम येथे नेण्यात आले आहे व तेथे उपचार पद्धती केले जाणार आहे.

यावेळी आत्माराम मोरये , संदीप कांडर , योगेश सदडेकर,प्रकाश खरात यांनी सुध्दा यांना वृध्दाश्रम येथे नेण्यासाठी मदत केली आहे. कणकवली पोलिस ठाण्याचे मनोज ऊर्फ बाळू गुरव यांनी वृध्दाश्रम ला छोटीशी आर्थिक स्वरुपात मदत केली आहे. या अशा सामाजिक कामाबाबत पोलिस तसेच जागरुक कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले जात आहे.