मंडणगड येथून दिनेश सापटे बेपत्ता

प्रहार  डिजिटलच्या  व्हाट्सअँप ग्रुप ला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा

मंडणगड । प्रतिनिधी :

सापटेवाडी मंडणगड येथील दिनेश राजाराम सापटे वय (50) हे 24 सप्टेंबर 2021 रोजी पहाटे आपल्या राहत्या घरातून कोणासही न सांगता निघून गेले.

त्यांचा शोध घेतला असता ते कोठेही सापडून न आल्याने वडील राजाराम दौलत सापटे यांनी यासंदर्भात मंडणगड पोलीस स्थानकात ते लापता असल्याची तक्रार दाखल केली आहे. मंडणगड पोलीस ठाणे येथील पोलीस हेडकॉन्स्टेबल डी.एस. बाणे यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.