महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या युवकांच्या गाडीला आंबोलीत अपघात

महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या युवकांच्या गाडीला आंबोलीत अपघात
चौघे जखमी : उपजिल्हा रुग्णालयात उपचार

सावंतवाडी l प्रतिनिधी : कोल्हापूर येथून महालक्ष्मीचे दर्शन घेऊन माघारी परतणाऱ्या सावंतवाडीतील युवकांच्या गाडीचा ताबा सुटल्याने आंबोलीत अपघात झाला. ही घटना काल रात्री उशिरा घडली. या गाडीत ४ प्रवासी असून यातील दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले
संबंधित युवक हे कोल्हापूर येथे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणाहून माघारी परतत असताना ते मध्यरात्री आंबोली येथे आले असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला. यात दोघांना गंभीर दुखापत झाली तर एक जण किरकोळ जखमी झाला. तात्काळ त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत उपचार करण्यात आले