सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

 

वेंगुर्ले | प्रतिनिधी
महाराष्ट्र टेनिस क्रिकेट अससोएशन आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट अससोएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सय्यद पिंपरी तालुका क्रीडा संकुल नाशिक येथे 23 ते 26 सप्टेंबर रोजी 5व्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा राज्य सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी मॅडम व राज्य तांत्रिक हेड श्री स्वप्नील ठोमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या .

राज्यातून तब्बल मुलांचे 22 व मुलींचे 8 जिल्हा संघांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा टेनिस क्रिकेट अससोएशनच्या ग्रामीण व शहरी मुले व मुली असे दोन दोन संघ सहभागी झाले होते . कुणाल हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याने 22 संघांमधून फायनल मध्ये प्रवेश केला पण अंतिम सामन्यात पाऊस पडल्यामुळे बॉल आऊट वरती निर्णय घेण्यात आला यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा उपविजेता ठरला . तसेच मुलींचा शहरी संघ 4थ्या स्थानावर राहिला . या स्पर्धेत सर्वकृष्ठ गोलंदाज म्हणून शुभम गावडे याची निवड करण्यात आली.

अश्या या चमकदार कामगिरीमुळे खेळाडूंनी निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात जास्त खेळाडूं मुले व मुली 17 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर रोजी यु पी येथील मथुरा येथे होणाऱ्या 6व्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे .
निवड झालेले खेळाडू राज्य सचिव मीनाक्षी गिरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आता राष्ट्रीय स्पर्धेत राज्यच प्रतिनिधीत्व करणार आहेत . राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूचे सामाजिक , राजकीय, क्रीडा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून कौतुक व अभिनंदन केले जात आहे .