स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात मोफत कोव्हीशिल्ड लसीकरण झाले सुरू

ऑन स्पॉट बुकिंगला प्रतिसाद

रत्नागिरी ।

स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात मोफत कोविशिल्ड लसीकरण सुरू झाले आहे. काही लाभार्थी ऑनलाईन बुकिंग करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी स्पॉट बुकिंगची सोय केली आहे. याकरिता लाभार्थ्यांनी तत्काळ देसाई अध्यापक विद्यालय, माळनाका येथे संपर्क साधावा.

सिरम इन्स्टिट्यूट, पुणे आणि दि यश फाउंडेशन आणि रा. स्व. संघ जनकल्याण समिती द. रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी शहर आणि लगतच्या परिसरातील १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हीशिल्डची पहिली व दुसरी मात्रा दिली जात आहे.

*६ ऑक्टोबर २०२१* रोजी होणाऱ्या लसीकरणाकरिता ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून *Appointment* घ्यावी. *Online Appointment* घेण्याकरिता आज www.cowin.gov.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांनी *दि यश फाउंडेशन, रत्नागिरी* या केंद्राअंतर्गत *Online Appointment* घ्यावी.

*नोंदणी करताना आपणास सशुल्क (Paid) दिसले तरी सर्व लसीसाठी किंवा सेवाशुल्क म्हणून कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही. लसीकरण संपूर्णपणे मोफत आहे, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने यांनी केले आहे.*

*अधिक माहितीसाठी*
*फोन नंबर- 02352- 356033*
फक्त व्हाट्सपसाठी 8208876273 / 8087239377 / 9545195333