वैभववाडीत उद्या आयुष्यमान भारत योजना नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ

वैभववाडीत उद्या आयुष्यमान भारत योजना नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ

आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे : सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे यांचे आवाहन

वैभववाडी । नरेंद्र कोलते :
जनगणना 2011 नुसार प्रधानमंत्री जन आरोग्य (आयुष्यमान भारत) योजना लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर आ. नितेश राणे यांच्या पुढाकाराने केंद्र शासनाच्या या योजनेतील लाभार्थ्यांना गोल्ड विमा कार्ड बनवून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ पंचायत समिती वैभववाडी येथे मंगळवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. मतदारसंघाचे लाडके आमदार नितेश राणे यांच्या हस्ते हा शुभारंभ पार पडणार आहे. तालुक्‍यातील 8691 इतक्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी हेल्थकेअर स्कीम आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना वर्षाला पाच लाख पर्यंत मोफत उपचार केले जाणार आहेत. खाजगी व सरकारी अशा दोन्ही रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधारकार्ड, रेशनकार्ड व प्रधानमंत्री कार्यालयाकडून आलेले पत्र असणे आवश्यक आहे. या शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने तालुक्यातील लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे यांनी केले आहे.